जिल्ह्यात सरासरी ३२.२ मि.मी.पाऊस ; वीज पडून इसमाचा मृत्यू

0
13

गोंदिया, दि.२४ : जिल्ह्यात १ ते २४ जून २०१६ या कालावधीत १०६४.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३२.२ मि.मी. इतकी आहे. आज २४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५०.६ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १.५ मि.मी. इतकी आहे.२४ जून रोजी गोंदिया तालुक्यातील पिंडकेपार (शेंदरीटोला) येथील छोटेलाल सुखराम बिसेन वय ३५ वर्ष हा इसम गावाच्या बाहेर शौचास गेला असता त्याच्या अंगावर वीज पडून मरण पावल्याची माहिती गोंदियाचे अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी दिली.
२४ जून रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- निरंक, गोरेगाव तालुका- १३.२ मि.मी. (४.४), तिरोडा तालुका- २३ मि.मी. (४.६), अर्जुनी मोरगाव तालुका- १४.४ मि.मी. (२.९), देवरी तालुका- निरंक, आमगाव तालुका- निरंक सालेकसा तालुका- निरंक आणि सडक अर्जुनी तालुका- निरंक. असा एकूण ५०.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १.६ मि.मी. इतकी आहे.