एम्समध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम यावर्षी सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे-मुख्यमंत्री

0
11

*नागपूरात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

*मिहानमध्ये एम्सला 150 एकर जागा.

*एम्सच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक नेमावा

नागपूर, दि. 3 : मिहान येथील जमिनीवर एम्सचा परिसर तयार होण्यास लागणारा
मोठा कालवधी लक्षात घेवून तातडीचे उपलब्ध ईमारतीत एम्सचा पहिल्या
वर्षातील काही विषयाचे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे
यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल वैद्यकीय अभ्यासक्रमातील काही विषयाचे
वर्ग सुरू होण्यासाठी जिल्हधिकाऱ्यानी विविध विभागाशी समन्वय साधून
तातडीने अहवाल सादर करावा अशी सुचना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी
आज नागपुरातील हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या
बैठकीत केली.
यावेळी केन्द्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन
गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रविण दटके,
मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिद म्हैसकर व केन्द्रीय आरोग्य विभागाचे वरिष्ठ
सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
मिहानमध्ये नाममात्र दरावर 150 एकर जागा एम्सला देण्यात आली आहे. एम्सची
उभारणी करतांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक नेमून विकास योजना
आराखडा तातडीने तयार करावा. जेणेकरून 1600 कोटी रूपयांचा हा प्रकल्प
देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी प्रयत्न करावे असेही मुख्यमंत्रीनी
यावेळी सांगितले.
एम्स उभारणीत काही अडचण येत असल्यास त्याचा तपशील मला द्यावा केंन्द्रीय
आरोग्यमंत्र्यांची चर्चा करून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील परंतू
यावर्षी एम्सचा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य आहे काय?
यासंदर्भात वेगाने पाऊल उचलावी असे आवाहन नितिन गडकरी यांनी यावेळी केले.
या बैढकीस, आमदार सर्वक्षी प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर
कोहळे, समीर मेघे, नागो गाणार, डॉ. मिलिद माने, विकास कुंभारे, अतिरिक्त
मुख्यसचिव डॉ. पी.एस.मीना, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे केंन्द्रशासनाच्या
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक शिनगारे शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित
होते.