तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी

0
7

२४ तासात ४०.१ मि.मी.पाऊस
जिल्ह्यात सरासरी १५९.४ मि.मी.पाऊस

गोंदिया,दि.३ : जिल्ह्यात १ जून ते ३ जुलै २०१६ या कालावधीत ५२५९.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १५९.४ मि.मी. इतकी आहे. आज ३ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १३२२ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ४०.१ मि.मी. इतकी आहे. तिरोडा तालुक्या तिरोडा मंडळ विभागात ११० मि.मी., मुंडीकोटा मंडळात ७० मि.मी. व ठाणेगाव मंडळात ८० मि.मी. पाऊस असा एकूण तालुक्यात ७१.९ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- २४९ मि.मी. (३५.६) , गोरेगाव तालुका- १२७.६ मि.मी. (४२.५), तिरोडा तालुका- ३५८.९ मि.मी. (७१.९), अर्जुनी मोरगाव तालुका- ८६.६ मि.मी. (१७.३), देवरी तालुका- ५१ मि.मी. (१७.०), आमगाव तालुका- २२४.५ मि.मी. (५६.१), सालेकसा तालुका- १३७.४ मि.मी. (४५.८) आणि सडक अर्जुनी तालुका- ८७ मि.मी. (२९.०) असा एकूण १३२२ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ४०.१ मि.मी. इतकी आहे.