मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक

0
6

नाशिक,दि.14 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत.

दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, बी. ए. डिझायनिंग, डीएमएलटी, बीएससीआयडी अशा अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या अभ्यासक्रमाची देखील मान्यता रद्द केली आहे.