“गोंडवाना’च्या कुलसचिवांनी दिले भारमुक्तीचे पत्र

0
36

गडचिरोली ,दि.13 – गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी आपल्याला तत्काळ भारमुक्त करण्यात यावे, असे पत्र कुलगुरूंना 1 ऑगस्टला दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

2011 मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. डॉ. विजय आईंचवार विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले आणि डॉ. विनायक इरपाते हे प्रथम कुलसचिव झाले. यापूर्वी डॉ. इरपाते हे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या विद्या शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित पारशिवणी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राचार्य होते. तेथून प्रतिनियुक्तीवर येऊन ते गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव झाले. डॉ. इरपाते यांचा प्रतिनियुक्तीचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यांनी संपत आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांनी भारमुक्त करण्याचे पत्र विद्यापीठाला दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. कुलगुरूंनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.