मेडिकलचे सर्व प्रवेश यापुढे फक्त ‘नीट’नेच

0
12

मुंबई, दि. २१ : वर्ष २०१७-१८ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशातील आंग्लवैद्यक आणि दंतवैद्यक या विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक प्रवेश परीक्षेने दिले जाणार आहेत. याला महाराष्ट्र सरकारनेही आज मंजूरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नीटच्या गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थी आपल्या पसंतीच्या कॉलेजचे पर्याय देऊ शकतात. पुढीलवर्षीपासून या पद्धतीने प्रवेश होणार आहे.

एकप्रकारे राज्यातील शिक्षणसम्राटांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. यावर्षीपासून नीटच्या गुणवत्तेनुसार राज्यात सामूहिक प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारने सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे.