चिचेवाडा येथे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद

0
13

देवरी- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील चिचेवाडा केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद काल गुरुवारी (ता.22) मुरदोली येथे आयोजित करण्यात आली होती.

मुरदोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख जी.एम. बैस हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच हंसराज हुकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागेश्वर तवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी साकुरे, विस्तार अधिकारी येटरे ,श्री दिघोरे, गटसमन्वयक लोकनाथ तितराम, विषयतज्ज्ञ धनवंत कावळे,संजय मस्के, शंकर वलथरे आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत अप्रगत मुलांना प्रगत कसे करावे या बाबतीत उपस्थित शिक्षकांना मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन  केले. विषयतज्ज्ञ धनवंत कावळे यांनी गणित संबोधाची परिणामकारकता कशा प्रकारे टिकवुन ठेवता येईल व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वापर करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या परिषदेतला चिचेवाडा केंद्रातील 16 शासकीय व 2 खासगी शाळेतील शिक्षकांनी हजेरी लावली.