त्या व्हिडिओ क्लिपमुळे निवडणूक आयोगाने जानकरांना पाठवली नोटीस

0
7

मुंबई. दि, 5 – देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या वृत्ताबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. याबाबत काही वाहिन्यांवर वृत्त प्रसारीत झाले होते, तसेच काँग्रेसकडून तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. नोटिस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत खुलासा द्यावा; तसेच खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिसमध्ये नमूद केले आहे .

निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.