गोंदिया बंद;भितीपोटी व्यवसायिकांनी ठेवली दुकाने बंद

0
13

गोंदिया,दि.23:बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक देवेश मिश्रा यांच्यावर रविवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्लयाच्या निषेधार्थ सोमवारला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह भाजपच्या संयुक्त विद्यमाने पुकारण्यात आलेल्या गोंदिया बंदला नागरिकांसह व्यावसायिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.शाळा महाविद्यालयांनी मात्र आदीच सुट्टी जाहिर करुन घेतली तर व्यवसायिकांनी भितीपोटी दुकाने उघडली नव्हती,ती दुकाने हळूहळू १२ वाजेनंतर उघडायला सुरवात झाली.
गोंदिया शहरात गेल्या २-३ वर्षापासून कायद्या सुव्यवस्था चे हनन करून गैरकानूनी व्यवसाय आणि शहरात वाढती गुंडगिरीमुळे जनसामान्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात व शहरानजीक घडलेल्या गेल्या काही घटनांत पिस्तूल निघणे ही आम बाब झाली आहे. अश्यातच काल रात्री बजरंगदलाचे विदर्भप्रांत संयोजक देवेश मिश्रा यांच्यावर अजय जयदेव मिश्रा या त्यांंच्या शेजारीनेच पिस्तूल व नंतर चाकूने केलेल्या हल्लयाच्या निषेधार्थ तसेच फरार आरोपीला अटक करण्याच्या मागणीला घेवून गोंदिया बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जनतेकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व भाजपच्या आव्हानावर गोंदिया बंद दरम्यान शहरातील शाळा,महाविद्यालये तसेच पेटोल पंप असोसिएशन ने बंदला समर्थन दिला.तर दुसरीकडे या बंदच्या विरोधात सोशल मिडीयावर चांगलीच टिका करण्यात आली.वैयक्तीक भांडणासाठी या संघटनानी बंदचे आवाहन करुन नवा पायंडा पाडल्याची चर्चा होती. मात्र शहरातील जीवनावश्यक वस्तुंसह थोक व चिल्लर भाजी बाजार नेहमी प्रमाणे सुरू राहिले. मात्र किराणा ओली, कपडाबाजार, भांडी बाजार, चनालाईन, जुने गंजबाजार ,मेन रोड,स्टेडियम परिसर आदि ठिकाणांच्या दुकाने बजरंग दलाच्या कार्यकत्र्यांनी मोटारसायकल रैली काढून दुकानदारांना विनंती करून बंद करायला लावली. कोणत्याही परिस्थितीची सामना करण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील,एसडीपीओ रमेश बरकते, शहर पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला,जितेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात सज्ज होते. गोंदिया पालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक इंगळे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले ,शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.