लिटिल फ्लावर शाळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत व्दितीय

0
21

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी झाली निवड
लाखनी,दि.25-जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाराच्यावतीने लाल बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा येथे दि. १८ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान आयोजित ४२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत द लिटिल फ्लावर इंग्लिश शाळा लाखनीची विद्यार्थिनी कु. श्रुती कोळवते हिने द्वितीय क्रमांक पटकावला. “बहुउपयोगी शेती” या विषयाअंतर्गत शेतीसोबत पशुपालन करत शेतकरी कसा आधुनिक होऊन सरकारच्या विविध योजनांच्या मदतीने शेतीला औद्योगिक स्वरुप देऊन समृद्ध होऊ शकतो, हे या प्रयोग प्रतिक्रुतीतून मांडलं. त्यामध्ये बायोगैस, सौरउर्जेचा वापर देखील दाखवला गेला. आज शेतकरी कठिण परिस्थितितुन जात आहे, अशा परिस्थितीत या प्रयोगातील विषय सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असा आहे.
या प्रयोगाला विज्ञान शिक्षिका मनीषा चानोरे यांनी मार्गदर्शन केले. लिटिल फ्लावर शाळेच्या या प्रयोगाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.या प्रयोगाची निवड आता सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. कु.श्रुती कोळवते हिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल शाळा सचिव सजंय वनवे, विश्वस्त महेंद्र राऊत, प्राचार्य कल्पना भोयर, पर्यवेक्षक आशीष बड़गे, सहा.शिक्षक प्रशांत वाघाये, मनीषा चानोरे, विशाल हटवार, कृष्णा उइके यांनी कौतुक केले.