लिटील फ्लावर शाळेच्या विद्यार्थ्यांची कृषी महोत्सवाला भेट

0
14

लाखनी,दि.२3- समर्थ मैदान लाखनी येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला द लिटिल फ्लावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. विविध नामांकित कंपन्यांचे स्टाल्स या महोत्सवात लावण्यात आले होते त्या सर्व स्टाल्सला विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. सर्व स्टाल्सवरील प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनीविषयी तसेच त्यांच्या शेतीविषयक उत्पादनांविषयी माहिती दिली. स्वराज ट्रैक्टर, साबर पंप्स, कृषी अवजारे, कृषी विभाग, भंडारा जिल्हा दुग्ध संघ, औषधी इ. स्टाल्स बघुन विद्यार्थी खुश झाले होते. शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच शेतीसंबंधी तांत्रिक गोष्टी अवगत होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वपूर्ण आणि आनंददायी होती. भेटीदरम्यान शाळेच्या प्राचार्या कल्पना भोयर, सहा.शिक्षक प्रशांत वाघाये, विशाल हटवार विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.