बीडीओंनी मान्य केल्या शिक्षक समितीच्या मागण्या

0
14

आमगाव,दि.13: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आमगावच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी यांना विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सफल चर्चा घडवून आणली. केंद्रीय वित्त आयोगामधून ग्रामपंचायतला देण्यात येणाऱ्या निधीतून शाळेला देण्यात येणारा निधी देण्यास काही सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करून मुख्याध्यापकांची दिशाभूल करीत होते. याची तक्रार समस्याग्रस्त मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षक समिती शाखा आमगावकडे करून मदत मागितली. त्यामुळे शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने बीडिओंची भेट घेऊन संबंधित प्रश्न सकारात्मक व तात्काळ आदेशाने मार्गी लावले. शालेय पोषण आहारचे बिल फेब्रुवारीपर्यंतचे मंजूर करण्यात आले आहे. दोन दिवसांत शाळेच्या खात्यात पैसे जमा होतील असे शा.पो.आहार अधीक्षकांनी सांगितले. शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस एल यु खोब्रागडे, डी.एल. गुप्ता, सुशिल पाऊलझगडे, डी.व्ही. बहेकार, एन. बी. बिसेन, संदीप मेश्राम, बी. एस. केसाळे, शोभेलाल ठाकूर, सुरेंद्र मेंढे, सुरेश कटरे, शरद उपलपवार, एस. टी. भालेकर , गणेश लोहाडे, अंजन कावळे, जलराम बुद्देवार, एन.जी. कांबळे, वाय. आय. रहांगडाले, के.टी. करंजेकर, एस. बी. बडे , एस.एम. येळे, के. जी. रहांगडाले, सुधीर येरंडे, इ.एफ. देशमुख, एस. के. पाथोडे इत्यादी उपस्थित होते.