युनिक कार्डसाठी १ व २ मे रोजी गोंदियात रेल्वेचे शिबिर

0
14

गोंदिया,दि.20 : रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाद्वारे दिव्यांगांना रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे सुट देण्यासाठी युनिक कार्ड जारी केले जाते. युनिक कार्ड जारी करण्याबाबत संबंधित शासकीय चिकित्सकाद्वारे व्यक्तीच्या नि:शक्ततेचे प्रमाणपत्र व मूळ रेल्वे कंसेशन प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या प्रमाणपत्राच्या सत्यापनात विलंब होत असल्यामुळे रेल्वेद्वारे युनिक ओळखपत्र जारी करण्यात विलंब होत आहे. त्यामुळे दिव्यांगांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिव्यांगांना रेल्वे सवलत मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरद्वारे १ व २ मे २०१७ रोजी गोंदिया स्थानकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित राहतील. या शिबिरात वाणिज्य विभागाचे अधिकारी तथा गोंदियाचे स्थानिक शासकीय चिकित्सक उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तिंना नि:शक्तता प्रमाणपत्र व रेल्वे कंसेशन प्रमाणपत्रांचा सत्यापन करतील. त्यामुळे वाणिज्य विभागाद्वारे युनिक कार्ड त्वरित जारी केले जावू शकतील. दिव्यांगांनी आपल्यासह फोटो, ओळखपत्र, एड्रेस प्रूफ, जन्म प्रमाणपत्र, चिकिस्येसंबंधी दस्तावेज सोबत आणावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.