शहारवानीची स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कुल झाली डिजीटल

0
11

गोरेगाव,दि.07 मे- तालुक्यातील शहारवानी येथील स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कूल पालक ,गावकर्यांच्या व संस्थेच्या सहकार्यातून डिजिटल शाळा झाली असून डिजीटल शाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक वनसरंक्षक यू.टी.बीसेन अध्यक्षस्थानी होते.तर सरंपच दिप्तीताई पटले या उदघाटक म्हणून उपस्थित होत्या.यावेळी गटशिक्षणाधिकारी वाय.पी. कावळे, सरपंच  राज तुरकर, पोलीस पाटील तेजलाल पटले,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश नेवारे,केंद्रप्रमुख राजेश लदरे, के.एल.कटरे, संस्थेचे अध्यक्ष व बार असो.चे अध्यक्ष एॅड.टि.बी.कटरे,तुकाराम गौतम उपसरपंच ,प्रा.डी.ए.चव्हान ,महाराजसींग कोडापे,सेवानिवृत्त आरएफओ रहांगडाले,एॅड.हरीणखेडे , एच.बी.पटले,विनोद गौतम, एस.जे.हरीणखेडे डाँ.टी.पी.येळे ,खेमचंद मेश्राम,धनराज पटले,छगनलाल गौतम ,सौ.डोंगरे,सौ.पटले,जे.एच.वैद्य,एस.एस.वासनीक,एस.के.शेंडे,देवचंद पटले,हौसलाल गौतम तसेच पालकवृंद , गावकरी मंडळी उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी केले तर संचालन कू.ओ.बी.ठाकरे यांनी केले.आयोजनासाठी ए.वाय.टेंभरे,एस.एल.बडोले , के.के.यादव , आर.एस.बीसेन , सी.के.कटरे , बि.टि.चौधरी , डी.एस.बीसेन , एल.आर.दुधबरवे यांनी सहकार्य केले.