नक्षल विभागाच्या जाबांज पोलिसांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार

0
13

गोंदिया,दि.07- नक्षलग्रस्त भागात नोकरी करतांना आपल्या जिवाची पर्वा न करता देशाच्या सिमेवर आतकंवाद्यांशी ज्याप्रमाणे जवान लढतात,त्याचप्रमाणे गोंदिया,गडचिरोली सारख्या भागातील जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यास नेहमीच पोलीस दलाचे शिपाई तत्पर असतात.अशाच काही पोलीस शिपायांनी नक्षलग्रस्त भागात आपले जिवाची पर्वा न करता केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र दिनी गोंदिया पोलीस विभागातील पोलिस अधिकारी व शिपायांचा प्रशस्तीपत्र व रोख राशी देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कारमुर्तीमध्ये गोंदिया नक्षल सेल विभागाचे पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे,पोलिस उपनिरिक्षक अझहरुद्दीन हुसनोद्दीन शेख,हवालदार राजेंद्र भेडारंकर,महिला हवालदार रीना चव्हाण,पोलिस नायक ओमप्रकाश जामनिक,रेखा धुर्वे,शिपाई तिर्थराज बिसेन,सुदर्शन वासनिक यांचा समावेश आहे.या चमूने 12 एप्रिल रोजी सालेकसा तालुक्यातील अतिसंवदेनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मुरकूटडोह दंडारी या भागातून एका नक्षल्याला आपल्या ताब्यात शिताफिने पकडले होते.त्याचप्रमाणे चांदसुरज पहाडावर लपवून ठेवलेले स्पोटक साहित्य हस्तगत केले होते.या सर्वांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे,पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील भूजबळ यांच्या उपस्थितीत गौरव केला.