बारावीच्या परिक्षेचा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८५.५७ टक्के

0
22

गडचिरोली, दि.३०: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता बारावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहिर केला असून,गडचिरोली जिल्ह्याचा ८५. ५७ टक्के निकाल लागला आहे. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व मागास असलेल्या भामरागड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३. ६४ टक्के लागला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात १३ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले होते. यापैकी १३ हजार ५०१  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ११ हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७०५ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७ हजार ९४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ६९६विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर २१० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ९३.६४ टक्के निकाल लागलेल्या भामरागड तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. गडचिरोली तालुक्याचा निकाल ८८.९९ टक्के लागला असून, हा तालुका द्वितीय क्रमांकावर राहिला आहे. सर्वांत कमी ७९.८९ टक्के कोरची तालुक्याचा निकाल लागला आहे.तालुकानिहाय निकालाची टक्केवारी गडचिरोली – ८८.९९, मुलचेरा – ८६.७८, अहेरी – ८२.९१,आरमोरी – ८४.५६, भामरागड – ९३.६४, चामोर्शी – ८३.५६, धानोरा – ८७.९६, एटापल्ली – ८४.९६, कोरची – ७९.८९, कुरखेडा – ८८.२२, सिरोंचा – ७६.२३