पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मोहक भोपळेचा सत्कार

0
12

जत,(जि.सांगली),दि.13-महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये राज्यात ग्रामीण विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी असलेल्या मोहक भोपळे विद्यार्थ्याचे जिल्हा परिषद शाळा व्हसपेठ तालुका जत येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रमाला जिल्हा परिषद सांगलीचे शिक्षण व आरोग्य सभापती तांमन्ना गौडा रवि-पाटील,माजी केंद्रप्रमुख बाबासाहेब काटे तसेच भाजपा नेते बजरंग होंकले,बिरा निळे यांच्या हस्ते मोहक भोपळेचा ट्रॉफी,पुस्तक,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षणसभापती पाटील यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करीत गुणवंत विद्यार्थी मोहकला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे,संतोष काटे,जिल्हा संघटक दिलीप वाघमारे,दीपक कोळी,तात्यासाहेब जाधव,सुभाष हुवाळे, लखन होनमोरे,मच्छिन्द्र ऐनापुरे,भारत क्षीरसागर,सुनील सूर्यवंशी,शरण जावीर,डी.एस.राजपूत,पिरप्पा ऐवळे आदी उपस्थित होते.यावेळी मोहक भोपळेचे पालक एपीआय पांडुरंग भोपळे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन संतोष काटे यांनी तर आभार सुभाष हुवाळे यांनी मानले.