कोरभींच्या डोहात दोन मुलांचा मृत्यू

0
9

चंद्रपूर,दि.13- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड़ तालुक्यातंर्गत येत असलेल्या कोरंभी येथील डोहात बुडून 2 मुलांचा मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवारला घडली.मृत मूलामध्ये शुभम रामटेके आणि नितीन कोलते यांचा समावेश आहे. ही दोन्ही मूले मोहाळी (मोकासा) येथील रहिवासी असून ते आपल्या पाच ते सहा मित्रासोबंत फिरायला गेले होते.दरम्यान डोहात पोहण्न्यासाठी उतरले असते दोघेजण बुडत असल्याचे बघून इतर मुले हे घाबरून पळून गेल्याचे वृत्त आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.