वैभव तुरकरची सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी म्हणून निवड

0
30

गोंदिया,दि.२९: गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता दिनेश तुरकर यांचे पुत्र असलेले वैभव तुरकर ची निवड सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी या पदावर झाली आहे. वैभवची निवड सीएजी (कॅग) विभागात करण्यात आली आहे. ही निवड आधी युपीएससी परीक्षोमार्फत करण्यात येत होती. वैभवने सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनीअरींग येथे प्रवेश घेतला आहे. सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ५९७ वा क्रमांक पटकावून आई-वडीलांचे व गोंदिया शहराचे नाव उज्वल केले आहे. वैभवच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.