शिवसेना-युवासेना पदाधिकाèयांची नियुक्ती

0
18

गोंदिया,दि.२९: शिवसेना प्रणीत युवा सेनेच्या गोंदिया जिल्हा कार्यक़ारिणीची घोषणा करुन पदाधिकाèयांची नियुक्ती माजी आमदार रमेश कुथे व शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गोंदिया जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून श्रीकांत (सोनू) चंद्रवंशी व उपजिल्हा प्रमुख म्हणून पुरुषŸोत्तम ठाकरे यांची निवड करण्यात आली. या नियुक्ती कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख तेजराम मोरघडे, माजी नगरसेवक हर्षपाल रंगारी, गजेंद्र फुंडे, दुर्गेश रहांगडाले, रुपेश कुथे, सुयोग चव्हाण, संजू समसिरे, राकी नायक, प्रल्हाद सार्वे, विनय दलाल, उपजिल्हा प्रमुख हिमांशृ कुथे, विक्की नागरीकर, भारती विद्यार्थी सेना जिल्हा संघटक प्रशांत कोरे, हर्षल पवार, लोकू पटले, पंकज उईके, राहूल करणिक, राजू सोनवाने, सोहन शेंद्रे, राहूल नागपुरे, कुणाल दीप, धर्मेश दीप आदी उपस्थित होते.