सडक-अर्जुनी येथे ओबीसी कृती समितीची बैठक उत्साहात

0
11

सडक-अर्जुनी,दि.२९: येथील इंदिरा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सडक-अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची आढावा सभा नुकतीच पार पडली. या सभेत सदस्यता नोंदणी मोहिम तसेच दिल्ली येथे झालेल्या अधिवेशनाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये असा ठराव पारित करण्यात आला. विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती पुर्ववत करावी यासाठी पाठपुरावा करने, जिलह्यात व तालुक्यात ओबीसी संघटनेला बळकट करण्यासाठी गाव पातळीवर सदस्यता मोहिम प्रभावीपणे राबविण्यावर चर्चा करण्यात आली. याच सभेत सडक-अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या प्रसिद्धी प्रमुख पदावर बबलू मारवाडे यांची निवड करण्यात आली. ही सभा अध्यक्ष दिनेश हुकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला सचिव दिनेश कोहळे, भुमेश्वर चव्हाण, हौसलाल चौधरी, डी.एल. कुकडे, एस.आर. मते, प्रकाश काशिवार, हेमराज बावणकर, अनिल कोरे, सुधाकर कुर्वे, जगदीश करंजीकर, पी.एन. बावनकर, हेमराज मेंढे, बी.बी.मारवाडे, जगदीश करंजेकर, अशोक लांजेवार आदी उपस्थित होते.