देशाचे भवितव्य हे शिक्षकांवर अवलंबून – नितीन कारवट

0
53
बी.बी.पब्लीक व बी.बी.इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षक दिवस
गोंदिया,दि.05- येथील बिरन बहुउद्देशिय शिक्षण संस्थाअंतर्गत येत असलेल्या बी.बी.पब्लीक व बी.बी.इंग्लीश स्कूलच्यावतीने शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेच्या सहसंचालिका स्विटी वैद्य ,प्राचार्या माहेरुख शेख यांनी दीप प्रज्वलन करुन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले.शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शिक्षकांचे स्वागत केले.विद्यार्थी विद्यार्थींनीनी आपल्या कला कौशल्यगुणांची प्रस्तुती सादर करुन भाषण,गीत,शायरी आदी सादर केले.नर्सरीच्या विद्यार्थंनीही यात सहभाग घेतला.श्रीमती वैद्य यांनी एक शिक्षिका आईच्या स्वरुपात सादर करीत गीत सादर केले.प्राचार्या शेख यांनीही मार्गदर्शन केले.संचालन दिपीका कोल्हटकर व माही मेश्राम ने केले.आभार चैलसी तुरकर हिने मानले.
पी.डी.रहागंडाले विद्यालयात शिक्षक दिवस
गोेरेगाव येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयात आज मंगळवारला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन कार्यक्रम घेण्यात आले.यात विद्याथ्र्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत विद्याथ्र्यांना शिकविले.शेवटी विद्याथ्र्यांनी शिक्षकांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एच.डी.कावळे होते.यावेळी ए.एच.कटरे यांनीही विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्ष कावळे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संचालन शाळानायिका रुपाली रहागंडाले हिने केले तर आभार आस्था पटले हिने मानले.
परशुराम विद्यालयात शिक्षण दिवस
गोरेगाव: तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे ‘शिक्षक दिनङ्कउत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शालेचे मुख्याध्यापक .बी.डब्लु.कटरे यांनी डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनावर विचार व्यक्त केले.शाळेच्या विद्याथ्र्यांनी स्वंय शासन उपक्रम राबविला.. या कार्यक्रमाला शाळतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन व्ही.एस.मेश्राम यांनी केले. – गणखैरा येथील हरिदास भवरजार हायस्कुल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्यध्यापक .बी .के. लिल्हारे होते. या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वश्री व्ही .आर .गजबे , एस .आर .गारोडे , श्रीमती .के .ए .मेन्ढे , आर .टी .ठाकुर ,जे .एस .कटरे, वाय .के .बिसेन, एम .एस .पवार, वी .पी , मेश्राम, एस .एच .वाकडे, एस .बी .टेम्भरे , टी .एस .बघेले, एम .एम .मौजे, यू .एम .धोटे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विध्यार्थी यांनी डॉ .राधाकृष्णन यांच्या जीवनीवर प्रकाश टाकले. कार्यक्रमाचे संचालन शाळानायक कु. माया शेंडे तर आभार प्रदर्शन कार्तिक लाडे यांनी केले .
IMG-20170905-WA0021
लाखनी –स्थानिक समर्थ विद्यालय येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त ङ्कशिक्षकदिनङ्क साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ता. ब.हुमे, उपप्राचार्य कि.मो.आळे, पर्यवेक्षक दा. ई. प्राधन वक्ते नि.कारवट उपस्थित होते.
यावेळी गीत मंचाच्या मुलींनी शिक्षक स्वागत गीत सादर करीत शब्दसुमनांनी शिक्षकांचे कार्यक्रमात स्वागत केले. तसेच विद्याथ्र्यांनी शिक्षकांचा कुंकूम तिलक लावून, गुलाबकांडी आणि भेटवस्तू देवून सत्कार करीत शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले. तसेच शिक्षकांसाठी हा दिवस आनंददायी व्हावा या हेतूनं विद्याथ्र्यांनी ङ्कवन मिनिट शोङ्क या खेळप्रकारात शिक्षकांना खेळतं करीत सर्वांना आनंदित केले. तसेच आपतूरकर, लिचडे, सौ.फरांडे, कु.कळ्याम या शिक्षकांनी गित सादर करीत विद्यार्थांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी शिक्षकांचं समाजातील स्थान कथन करीत जिवनातील गुरुंची आवश्यकता ही किती महत्वाची असते हे सुंदर उदाहरणांद्वारे वक्ते नितीन कारवट यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्याथ्र्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कु.ऐश्वर्या बारस्कर हिने, प्रास्ताविक कु.दिक्षिता बावनकुळे हिने तर आभार कु.सायली बोळने हिने मानले.