अवैध्य शिकवणी वर्गाविरोधात एनएसयुआयचे निवेदन

0
14

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्हा एनएसयुआयच्यावतीने शहरात सुरु असलेल्या अवैध खासगी शिकवणी वर्गाची चौकशी करुन त्यामध्ये शासकीय व अशासकीय शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकांची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यासोबतच शिकवणीच्या नावावर पालकाकंडून होणारी लूट थांबविण्याबाबतचे निवेदन शुक्रवारला(दि.3)शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.त्या निवेदनात गोंदिया शहरातील खासगी शिकवणी वर्गाच्या यादीसह शिक्षकांचीही काही नावे देण्यात आली आहेत.अनुदानीत शाळेतील शिक्षक शाळेमध्ये न शिकवता विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावा अन्यथा प्रात्यक्षिकाचे गुण मिळणार नाही अशी भिती दाखवून शाळेत शिकवत नसल्याने त्या शिक्षकावर त्वरीत कारवाई करण्यात यावी.सर्व शिकवणी वर्गाची आयकर विभागाने चौकशी करावी,शिकवणी वर्गात शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक कागदपत्र तपासण्यात यावे आदी मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी आलोक मोहंती,हरिश तुळसकर,रोहन रंगारी,सुमित महावत,तैशिम शेख,कार्तिक भेलावे,अंकुश कांबळे,हिमांशू सोनकुसरे,निक्की येडे,गौरव चन्नेकर,अमित मारुबंध,शुभम सहारे,हर्षद करोसिया,राहुल बावनथडे,कार्तिक तुरकर,अन्स बोरकर,संघर्ष मेश्राम,रंजित रहागंडाले,रोहित वैद्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.