भंडार्यात मोर्चेकरांचा शासनाविरूद्ध ‘आक्रोश’

0
14

भंडारा,दि.05 : देशाची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांच्या विविध समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. यावर प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहे. या मोर्चेकरांनी शासनाविरूद्ध ‘आक्रोश’ व्यक्त करताना शासकीय अधिकारी व मंत्र्यांविरूद्ध घोषणाबाजी करून त्यांचा आक्रोश व्यक्त केला.
भंडारा जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे, मुकेश मेश्राम, ओमप्रकाश गायधने, संदीप वहिले, धनंजय बिरणवार, सुधाकर ब्राम्हणकर, ईश्वर नाकाडे, हरीकिसन अंबादे, ईश्वर ढेंगे, रमेश पारधीकर, युवराज वंजारी, मुकूंद ठवकर, वसंत साठवणे, गिरीधारी भोयर, केशव बुरडे, संजीव बावनकर, सुधीर वाघमारे आदींनी केले. शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात धडकला. या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. मोर्च्यादरम्यान संतप्त शिक्षकांनी त्यांच्या न्याय मागण्या पूर्णकरण्यासाठी प्रशासन हतबल झाले असल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षकांचा रोष शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांचेविरूद्ध प्रकर्षाने आढळून आला. दरम्यान या मोर्चाला कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.