शेतकर्यांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल

0
11

भंडारा,दि.05 : जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.२०१७ या वर्षात शेतकºयांना कर्ज दिले आहे. त्यासोबत धानपिकासाठी व्यक्तीश: विमा कपात केला असून झालेल्या धान पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ विमा कंपनीने देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवदेनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, ७ व ८ आॅक्टोंबर २०१७ रोजी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळवाºयामुळे उभे असलेले धान जमीनदोस्त झाले. धानपिकाला तुडतुडा व विविध प्रकारच्या किडींनी नष्ट केले आहे. त्यानंतर उभा असलेल्या धान पिकाला पांढºया तुडतुडा अळीने आक्रमण केले. यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची नासाडी झालेली आहे व होत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांनी विमा कपंनी तसेच शासनाकडे अर्ज दाखल केले. पंरतु अजूनपर्यंत धानपिकाचे सर्व्हे करण्यासाठी कोणीही अधिकारी, कर्मचारी आलेले नाही.
कर्मचारी-अधिकारी धरणे, मोर्चे करीत आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकºयांच्या होणाºया पिकाच्या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नाही. नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्या करावी की काय, असे प्रश्न शेतकºयांपुढे आहेत. विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी बेपत्ता झाले आहेत. म्हणून अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे यांच्या नेतृत्वात विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, बळीराम सार्वे, कन्हैया नागपूरे, रानबा केसलकर, घनश्याम भुरे, रणविर भुरे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे यांच्यामार्फत निवेदन पाठविले.