विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन

0
13

गोंदिया,दि.१४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, अपंग विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे.
सर्व ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी सन २०१७-१८ पासून हींींीि://ारहरवलीं.र्सेीं.ळप हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांचेशी व जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.गोंदिया यांनी कळविले आहे.