संघी टॉपर्स अवॉर्ड सोहळा बुधवारला

0
27

आमगाव, : संघी परिवार गोंदियातर्फे प्रावीण्यप्राप्त विद्याथ्र्यांना दरवर्षी संघी टॉपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते. यंदादेखील या पुरस्काराचे वितरण शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त ४ फेब्रुवारी रोजी बुधवारी श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे आयोजित आहे. या वेळी प्रावीण्यप्राप्त विद्याथ्र्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येईल.
संघी टॉपर्स अवॉर्डसाठी नेहल बंगाळकर, गीतेश्वरी बिसेन, ज्योती भेलावे, नवल डोमळे, शुभम चौव्हान, मृणाली मेश्राम, पूनम तुरकर, रिना बोरकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केशवराव मानकर, सुरेशबाबू असाटी, प्राचार्य डी. के. संघी यांनी केले.