१० पटांच्या शाळा बंद करू नका

0
9

देवरी दि.११: १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, यासाठी देवरी येथील पंचायत समितीसमोर देवरी तालुका शिक्षक कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच १० पटाच्या शाळा बंद करण्याचा निषेध कृती समितीतर्फे करण्यात आला.
मोर्चाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने झाली. देवरी शहरातून शासनाच्या विरोधात घोषणा देत रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनाला सुरूवात झाली. प्रास्ताविक सपना श्यामकुवर यांनी मांडले. तसेच तालुका समन्वयक संदीप तिडके यांनी मार्गदर्शनातून, ग्रामीण संस्कृतीचे रक्षण करणारी व विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रूजविणारी जिल्हा परिषद शाळा म्हणजे संस्कार केंद्र आहेत, असे मत व्यक्त केले. या वेळी सारंगधर गभणे, गजानन पाहणकर, चेतन उईके, वितेश खांडेकर, राजकुमार बारसे, शितल कनपटे यांनी मार्गदर्शन केले.धरणे आंदोलनात संदीप तिडके, सारंग गभणे, गजानन पाहणकर, विनोद चौधरी, वितेश खांडेकर, सुरेश कश्यप, रमेश उईके, चेतन उईके, विनोद बहेकार, आदेश धारगावे, दीपक कापसे, शितल कनपटे, मिथून चव्हाण, सुनील चव्हाण, राजकुमार बारसे, एम.सी. हुड्डा, विशाल कच्छवाये, जितू कोहाडकर, जीवन आकरे, आर.डी. गणवीर, अशोक बन्सोड, प्रवीण सरगर, तेजराम नंदेश्वर, दिनेश इनवाते, अविरत सय्याम, अरूण सावरकर, विरेंद्र खोटेले, प्रकाश गावडकर, ज्योती डाबरे, सपना श्यामकुवर, प्रगती निखाडे, वर्षा वालदे, रेखा पायधन, गायत्री आत्राम यांच्यासह समितीतील अन्य शिक्षक सहभागी झाले होते.