आरटीईसाठी २४ जानेवारीपासून अर्जनोंदणी

0
8

गोंदिया,दि.05 – शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत राज्यभरात आरटीईतील २५ टक्के  जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात बुधवारपासून (दि. ३) २५ प्रवेश शाळांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात २४ जानेवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

गतवर्षीपासून आरटीईच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात ६६७ शाळांमधील सात हजार जागांवर प्रवेश देण्यात आले होते. त्यासाठी तेरा हजार पालकांनी अर्ज सादर केले होते. यावर्षी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज सादर करायचे आहेत. १२ फेब्रुवारीला आरटीईचा पहिला ‘लकी ड्रॉ’ १२ फेब्रुवारीला काढण्यात येईल. सहा लकी ड्रॉ काढून २६ एप्रिलपर्यंत प्रक्रिया संपविण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पालकांना अर्जात केवळ दहा शाळांची नावे भरावे लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्याला प्रवेशफेरीमध्ये ज्या शाळेत प्रवेश मिळाला. त्याला त्याच शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. असे न केल्यास त्या विद्यार्थ्याचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. मात्र, गतवर्षापर्यंत एकदा प्रवेश नाकारल्यावर त्याला पुन्हा पुढच्या लकी ड्रॉमध्ये समाविष्ट करण्यात येत होते.

प्रतिपूर्तीवर प्रश्‍नचिन्ह
राज्यात २०११ पासून आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्यात येत आहेत. मात्र, अद्याप शहरासह राज्यातील शाळांना सहा वर्षांत पन्नास टक्केही प्रतिपूर्ती मिळालेली नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा शाळा संघटनांकडून दबाव टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेशबंदीचे हत्यार उपसण्याची शक्‍यता आहे.

अशा आहेत तारखा 
शाळांची नोंदणी – ३ ते २० जानेवारी
शाळांची तपासणी – २२ ते २३ जानेवारी
अर्ज भरण्याची प्रक्रिया – २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

पहिला लकी ड्रॉ – १२ ते १३ फेब्रुवारी
प्रवेश – १४ ते २२ फेब्रुवारी
रिक्त जागांची माहिती – २३ ते २४ फेब्रुवारी

दुसरा लकी ड्रॉ – २६ ते २७ फेब्रुवारी
प्रवेश – २८ फेब्रुवारी ते ५ मार्च
रिक्त जागांची माहिती – ६ ते ७ मार्च

तिसरा लकी ड्रॉ – ८ ते ९ मार्च
प्रवेश – १० ते १६ मार्च
रिक्त जागांची माहिती- १७ ते १९ मार्च

चौथा लकी ड्रॉ -२० ते २१ मार्च
प्रवेश – २२ ते २८ मार्च
रिक्त जागांची माहिती – ३१ मार्च ते २ एप्रिल

पाचवा लकी ड्रॉ – ३ ते ४ एप्रिल
प्रवेश – ५ ते ११ एप्रिल
रिक्त जागांची माहिती-१२ ते १३ एप्रिल

सहावा लकी ड्रॉ- १६ ते १७ एप्रिल
प्रवेश-१८ ते २४ एप्रिल
रिक्त जागांची माहिती-२५ ते २६ एप्रिल