अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

0
7
  • ३० नोव्हेंबरपर्यंतच ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार

वाशिम, दि. १५ : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व व्यावसायिक अभ्यासक्रमांना निर्वाह भत्ता योजनेचे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार नाहीत. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरून सूचना देण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरलेले नाहीत. तरी सर्व महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०१८ पूर्व अर्ज सादर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाने mahadbtmahait.gov.in हे पोर्टल नव्याने विकसित केले असल्याने सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचे अर्ज याच शैक्षणिक वर्षात भरणे बंधनकारक आहे. या वर्षीचे अर्ज पुढील शैक्षणिक सत्रात भरता येणार नाहीत. या कारणामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावयाचे असल्याने विद्यार्थ्यांच्या अर्जांची प्रिंट व विद्यार्थ्यांची संपूर्ण कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत, असे श्रीमती सोनवणे यांनी यांनी कळविले आहे.