31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक परशुराम विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

परशुराम विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
34

blank

गोरेगाव,दि.२३ः- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथील इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज शनिवारला उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष हूमराज बावनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पटले हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक व्ही.एस.मेश्राम यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक टी.एफ.ईडपाचे यांनी मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

blank