शिक्षण, संशोधनाचा भावार्थ समजुन परिवर्तनाची सुरूवात करा-ना.गडकरी

0
16

औरंगाबाद :-जागतिक स्तरावर भारतीची गरीब लोकाचा श्रीमंत देश अशी निर्माण झालेली ओळख पुसुन ज्ञान,विज्ञान व पुसुन ज्ञान,विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर निर्माण झालेल्या प्रगतशील देश हा ठसा आपलल्याला उमटावायचा आहे. जग हे बदलु शकते यासाठी शिक्षण, संशोधनाचा भावार्थ समजुन घेऊन परिवर्तनाची सुरूवात स्वत पासुन करा, असे आवाहन ना.नितिन गडकरी यांनी केले.
डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षात समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी हा शानदान सोहळा झाला.महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती माननीय चे.विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली हा सभारंभ झाला. यावेळी कुलगुरू प्रोफेसर बी.ए.चोपडें,कुलसचिव डॉ.गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मिक सरवदे यांची पाहुण्यासह पहिल्या रांगेत उपस्थिती होेंती.व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अशोक मोहेकर,डॉ.दत्तात्रय आघाव, डॉ. प्रतिभा पाटील,डॉ.वसंत सानप ,डॉ.शिवाजी मदन, डॉ.देवानंद शिंदे,डॉ.गणेश शेटकर, डॉ. अप्पासाहेब हुबे,डॉ.गीता पाटील,संजय निबांळकर, डॉ.मेहेर पाथ्रीकर, बीसीयुडी चे संचालक डॉ.के.व्ही.काळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरूद्दीन,डॉ.बळीराम लहाने,डॉ.महेश शिवणकर यांची उपस्थिती होती. तसेच सर्व विद्याशाखांचे अधिष्ठता डॉ.भारत हांडीबाग ,डॉ. अशोक मोहेकर, डॉ.बी.एच.चौधरी,डॉ.विलास खंदारे,डॉ.एम.एस.शेख, डॉ.शोभना जोशी ,डॉ.कल्याण लघाणे, डॉ.हरिदास विधाटे, डॉ. उल्हास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.