खजरी क.महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा १००% तर कला शाखेचा निकाल ९४.३५%

0
19

सडक अर्जुनी,दि.२८: तालुक्यातील आदिवासी विकास कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथील इ.१२वी कला शाखेचा ९४.३५% व विज्ञान शाखेचा १००% निकाल लागला असून उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे संस्थाचालकासह,प्राचार्य व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग नागपूर च्या वतिने फेब्रु.२०१९ मध्ये आयोजीत इ.१२ वी च्या परीक्षेत,आदिवासी विकास कला,विज्ञान उच्च माध्य.विद्यालयाच्या वतिने कला शाखेत १२४ परीक्षाथ्र्यानी परीक्षा दिली.त्यापैकी प्रथम श्रेणीत ४२,द्वितीय श्रेणीत ७३,तृतिय श्रेणीत २ असे एकूण ११७ परीक्षार्थी उत्तिर्ण झाले.निकालाची टक्केवारी ९४.३५ आहे.तर
विज्ञान शाखेत ६५ परीक्षाथ्र्या पैकी विषेश प्राविण्य श्रेणीत ३ ,प्रथम श्रेणीत ५३,द्वितीय श्रेणीत ९ ,असे ६५ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १००% आहे.जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली चे अध्यक्ष जगतराम रंहांगडाले,सचिव नारायनराव येडे,प्राचार्य खुशाल कटरे,उप प्राचार्य बी.आर.देशपांडे, पर्यवेक्षक आर.के.कटरे क.महा.प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर,प्रा.डी.के.जांभुळकर,प्रा.के.के.तागडे,प्रा.सुरज रामटेके,प्रा.संजय येळे,प्रा.दिपक मांढरे,प्रा.छाया टेंभरे,प्रा.श्रध्दा तिरपूडे,प्रा.उत्तरा तागडे,प्रा.धनराज लंजे,प्रा.नितीन पुस्तोडे या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी यशस्वी व गुणवंत विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले.