जि.प.शाळेतील शिक्षकांची रिक्तपदे त्वरित भरा-किशोर तरोणे

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.24 : तालुक्यात एकूण सात ठिकाणी बंगाली वसाहती ओत. सातही बंगाली वस्त्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. मात्र शाळांमधील शिक्षकांची पदे मागील वर्षभरापासून रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे.
तालुक्यातील दिनकरनगर,, रामनगर, संजयनगर, गौरनगर, अरुणनगर, पुष्पनगर अ, पुष्पनगर ब अशा एकूण सात शाळांमध्ये बंगाली शिक्षकांचे २0 पद मंजूर आहेत. मराठी शिक्षकांचे पाच आणि हिंदी शिक्षकांचे ५ असे एकूण ३0 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये दिनकरनगर येथे चार शिक्षक मंजूर असून त्यापैकी केवळ एक पद भरले आहे. तर तीन पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर मंजूर पदे २ त्यापैकी बंगाली शिक्षकांचे एक पद भरले असून एक पद रिक्त आहे.
संजयनगर येथे बंगाली शिक्षकांची दोन पदे मंजूर असून दोन्ही बंगाली शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गौरनगर येथे चार बंगाली शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी चारही शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी दोन पदे भरलेले आहेत तर दोन रिक्त आहेत. पुष्पनगर येोि दोन पदे मंजूर असून एक पद भरलेले आहे. एकूण २0 बंगाली शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी दहा बंगाली शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दिनकरनगर शाळेत १३८, रामनगर ४७, संजयनगर १३१, गौरनगर १८३, अरुणनगर १५६ विद्यार्थी, पुष्पनगर २१, पुष्पनगर व १९ असे एकूण ५९५ विद्यार्थी सातही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीने अनेकदा जि.प.शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करुन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. मात्र अद्यापही रिक्त पदे न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिकक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी किशोर तरोणे यांनी केली आहे.