राज्य युवा संसदेसाठी निखिल, हर्षिता व रोमनची निवड

0
29

आमगाव,दि.31 : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे ‘युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही’ याविषयावर जिल्हास्तरीय युवा संसद या कार्यक्रमामध्ये निखिल बंसोड, हर्षिता पाथोडे व रोमन घाटा यांनी उत्कृष्ट सदस्य म्हणून यश प्राप्त केले. ते ३0 व ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार्‍या राज्यस्तर युवा संसदेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील श्री लक्ष्मणराव मानकर अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेचे उद््घाटन प्राचार्य डॉ. दिलीप संघी यांच्या अध्यक्षतेखाली पंस उपसभापती जयप्रकाश शिवणकर यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डी.एम. राऊत, क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यातील २६ स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी स्पर्धकांनी शासनाच्या विविध योजना, उपक्रम, सुप्रशासन, चांद्रयान मोहिमासह स्थानिक समस्यांवर चर्चा केली. स्पधेर्चे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. संघी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे, ए.बी. मरस्कोल्हे उपस्थित होते. विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच तालुक्यातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. तोषिका पटले, डॉ. नोहरलाल लिल्हारे, प्राचार्य एम. पी. शेख काम पाहिले. संचालन विनायक अंजनकर यांनी केले. आयोजनासाठी सुरेश कोसरकर, हेमंत चावके, प्रा. कथलेवार, जगदीश बडगे, कोमल रहिले आदींनी सहकार्य केले.