अखेर पटेलांच्या पुढाकाराने मेडिकल कॉलेजच्या मार्ग मोकळा

0
17

गोंदिया,दि. १६,–राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदयाच्या शासकीय मेडिकल कॉलेजचा रेंगाळत असलेल्या प्रश्नावर लक्ष घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केलेल्या चर्चेमुळे अखेर गोंदियाच्या मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावात त्रुट्या असतानाही मंजुरी मिळाली आहे.विशेष म्हणजे खासदार नाना पटोले यांनीही मेडिकल कॉलेज याच सत्रात सुरू होण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
केंद्रीय मेडिकल शिक्षण व आरोग्य मंत्रालयाने गोंदिया मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दिला तर चंद्रपूरच्या कॉलेजला स्पष्टपणे नाकारले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याच मतदारसंघातील मेडिकल कॉलेज नाकारण्यात आल्याने भाजप गोटात चर्चेला उधाण आले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या शिष्टाईमुळे थेट पंतप्रधान कार्यालयातून गोंदियासाठी कॉलेज मिळाल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर आणि गोंदियातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजबाबत येत्या १५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, असा आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिला होता. मात्र, त्या दोन्ही कॉलेजमध्ये भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) पाहणी केली असता चंद्रपुरात २४ आणि गोंदियात ३१ त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यासोबतच राज्य सरकारने कॉलेजचा प्रस्ताव पाठवला तेव्हा आवश्यक असणाèया पायाभूत सुविधा नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे एमसीआयने दोन्ही कॉलेजला परवानगी देता येणार नसल्याचा असा स्पष्ट अभिप्राय केंद्रीय मेडिकल एज्युकेशन सचिवांकडे सादर केला होता.
त्यावर सचिवांना सोमवारीच निर्णय घेणे आवश्यक होते. एमसीआयची शिफारस योग्य ठरवीत सचिवांनी दोन्ही कॉलेजला परवानगी नाकारावी, असा अभिप्राय केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना पाठवला होता. केंद्रीय आरोग्यमंत्र्याने गोंदिया मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव नाकारल्याचे प्रफुल पटेल यांना कळताच त्यांनी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधला.त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नकारात्मक अहवाल असतानाही त्रुटी दूर करण्याच्या अटीवर कॉलेजला परवानगी संपर्क साधला.त्यामुळे
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नकारात्मक अहवाल असतानाही त्रुटी दूर करण्याच्या अटीवर कॉलेजला परवानगी दिल्याने गोंदियात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पटेल पुन्हा विकासाच्या बाबतीत राजकारण करीत नसल्याचे या मेडिकल कॉलेजच्या मुद्यावरून स्पष्ट झाले आहे.