शिस्तप्रिय भाजपमध्ये उमेदवारीला घेऊन मोठ्याप्रमाणात बंडखोरी

0
16

गोंदिया दि. १६,-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या धामधुमीत १५ तारखेपर्यंत शेकडोच्या संख्येत अर्ज दाखल झाले आहेत.एका गटासाठी दहा ते १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून देशात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपला मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार निवडतांना नाकी नऊ आले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत(दि.१५)भाजपला आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करता आली नाही,यापेक्षा या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे व जिल्ह्याचे पालकमंत्र्यासह पक्ष संघटनमंत्र्याचे चांगले अपयश दुसरे राहूच शकत नाही.त्यातही बहुतांश ठिकाणी भाजपने स्थानिक उमेदवारांना डावलत हितसंबध बघत दुसèया मतदारसंघातील पार्सल उमेदवारांना उमेदवारी देऊन स्थानिक कार्यकत्र्यांवर अन्याय केल्याचा रोष भाजपच्या कार्यकत्र्यांत दिसून येत आहे.
विशेष म्हणजे गेल्या अंकात साप्ताहिक बेरार टाईम्सने सोनी, खमारी,आसोली,माहुरकुडा वाड्यावर या मथळ्याखाली प्रकाशित वृत्तामध्ये भाजपच्या संभाव्य काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती.त्यातील बहुतांश उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिल्याने बेरार टाईम्सचे उमेदवारीसंदर्भातील भाकीत खरे ठरले.असे असतानाच एकीकडे काही मतदारसंघात पार्सल उमेदवार नको असे कार्यकर्ते सांगत असतानाच दुसरीकडे मात्र काही मतदारसंघात पार्सल उमेदवार आनंदात भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी का स्वीकारत आहेत.
माहुरकुडा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी पार्सल नको म्हणून पदाधिकारी व कार्यकत्र्यांंना पत्र पाठविल्याचे सांगत असतानाच गोठणगाव या मतदारसंघात बोडंगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवासी असलेल्या रचना गहाणे या पार्सल उमेदवार कशा चालतात.पुराडा मतदरासंघातील विद्यमान जि.प.सदस्य भर्रेगाव जि.प.साठी कसे आदी प्रश्नांची उत्तरे मात्र ते कार्यकर्ते देऊ शकले नाही.यावरून फक्त काहीसांठीच विरोध करायचे आणि काहींना खुला मार्ग करायचे ही पद्धतही भाजपने स्वीकारली आहे.
भाजपच्या पार्लिमेंटरी बोर्डच्या निर्णयाने तर यावेळी अनेकांना धक्का दिला,तसे धक्के देण्याची पद्धत काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये असतांना त्यांचा मंत्र भाजपने स्वीकारत तुम्ही विधानसभेत आमच्या विरोधात काम केलात मग कशी उमेदवारी द्यायची.तुम्हाला ओळखते तरी कोण तुमच्या मतदारसंघात असे अनेक प्रकारचे निरर्थक प्रश्न विचारून चांगल्या उमेदवारांना संधी ही नाकारली. तर काही ठिकाणी पक्षाने खूप संधी दिल्यानंतरही उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे.त्या बंडोबाचा बंड उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत टिकून राहतो की नाही हा येणारा सोमवारच सांगणार आहे.कवलेवाडा जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी मागणारे सदालाल भोडेंकर यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे.
माहुरकुडा येथे सुध्दा उमाकांत ढेंगेच्या विरोधात खुशाल नाकाडे,नीलकंठ पुस्तोडे,प्रदीप मस्के यांनी अर्ज दाखल केला आहे.तिकडे बोंडगावदेवी गटासाठी प्रमोद पाऊलझगडे यांच्या पत्नीसाठी खा.नाना पटोले जोर लावून आहेत. परंतु पटोलेंना अद्यापही यश आलेले नाही. तर तिकडे महामंत्री लायकराम भेंडारकर हे आपण संघाचे आहोत,संघ आपल्या हातात असल्याने आपल्याच पत्नीला शेवटच्या क्षणी एबी फार्म मिळेल या तोèयात वावरत आहेत.भाजपकडून अपेक्षा भंग झाल्याने अखेर चिरचाळबांधचे मुक्तानंद पटले,माजी.जि.प.सदस्य सुखराम फुंडे यांनीही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीची वाट धरली.एकोडी गटात अजाबराव रिनायत यांच्या बाजूने पार्लिमेंटरी बोर्ड असताना दांडेगावचे सरपंच सुरेश पटले यांनी कशी बाजी मारली कुणास ठाऊक.आसोलीमध्ये उमेदवारीवरून मारहाणीचे महाभारत घडल्यानंतरही अमित बुध्दे हे उमेदवारी घेण्यात यशस्वी राहिले.तसे त्यांची उमेदवारी माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे यांचे विरोधी म्हणून जिल्हाध्यक्ष व संघटनमंत्र्यानी आधीच पक्की केली होती.
खमारीत मात्र भाजपने विहीप आणि बजरंगदलाला धक्का दिला.सोनी मतदारसंघात रविकांत बोपचे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला,परंतु त्यांच्या विरोधात भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व विद्यमान जि.प.सदस्य सीता रहागंडाले व युवा मोच्र्याचे माजी पदाधिकारी राहिलेले पंकज रहागंडाले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.डव्वा गटासाठी डॉ.भूमेश्वर पटले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते पांढरी क्षेत्रातील मूळचे रहिवासी असल्याने या मतदारसंघात ते पार्सल उमेदवार असल्याचे स्थानिक भाजप कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे.सुकळी डाकराम गटातून एैनवेळेवर आलेल्या रजनी सोयाम यांना उमेदवारी दिल्याने दमयंता कोकुडे यांची इच्छा अर्धवट राहिली.