गोंदिया जिल्ह्यात २३१ मुले शाळाबाह्य

0
11

गोंदिया दि ८:: शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३१ मुले-मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.गोंदिया जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेली १६५ बालके, मध्येच शाळा सोडलेली ६६ बालके असे एकूण २३१ बालके शाळाबाह्य आढळली. या सर्वेक्षणात शाळाबाह्य आढळलेल्या या बालकांचे आधार कार्ड काढून दिले जाणार आहे
जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार २८४ कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी १० हजार ४३४ व्यक्ती सहभागी झाले होते. त्यात शिक्षकांसह इतर विभागांचे कर्मचारी आणि कधीच शाळेत न गेलेल्या तसेच मध्येच शाळा सोडलेल्या बालकांचे व सतत ३० दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन हे सर्वेक्षण करायचे होते. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी फक्त घरोघरी जाऊनच सर्व्हेक्षण केले.
आमगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ७४ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ७७ बालके शाळाबाह्य आढळली. विशेष म्हणजे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकही मुलगा शाळाबाह्य आढळला नाही. देवरी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली १० बालके, मध्येच शाळा सोडलेली ७ बालके असे १७ बालके शाळाबाह्य आढळली.गोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ४८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३२ बालके असे ८० बालके शाळाबाह्य आढळली. गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला १ बालक, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ४ बालके शाळाबाह्य आढळली. सडक-अर्जुनी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ८ बालके असे १६ बालके शाळाबाह्य आढळली. सालेकसा मध्येच शाळा सोडलेली १ मुलगी शाळाबाह्य आढळली. तिरोडा तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली २४ बालके, मध्येच शाळा सोडलेली १२ बालके असे ३६ बालके शाळाबाह्य आढळली.