१०३ गावांत दूषित पाण्याचे स्रोत

0
10

भंडारा,दि ८:जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पावसाळा पूर्व स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या सर्वेक्षणात ५४२ ग्रामपंचायती अंतर्गत ६,०५० पाण्याचे स्त्रोत तपासण्यात आले. यातील १०३ गावात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले. लाखांदूर तालुक्यातील मांदेड व विरली (बुज.) या दोन गावांना लाल कॉर्ड देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतीं पैकी १०३ गावांत पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले असून १०१ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. या गावांना सलग पिवळे कार्ड मिळाल्यास त्यांना डेंजर झोनमध्ये टाकून रेड कार्ड दिले जातात. दोन वर्षे रेड कार्ड मिळाल्यास अशा ग्रामपंचायतचे अनुदान रोखण्याचे अधिकार प्रशासनाला असतात. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात केवळ नोंद असलेल्या पाण्याचेच स्त्रोत तपासले जातात. वास्तवात प्रत्येक ग्रामपंचायतीने आरोग्य विभागात पाण्याच्या स्त्रोतांची नोंद असेलच असे नाही.