आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षा : १९६ विद्यार्थ्यांचा सहभाग

0
11

भद्रावती दि. २०: प्रशासकीय परीक्षेत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षीपासून बाळासाहेब आयएएस अकादमी सुरु करण्यात आली. या अकादमीतर्फे आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षेचे आयोजन स्थानिक कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे १९ जुलैला करण्यात आले. यामध्ये एकूण २२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर १९६ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले.

या स्पर्धा परीक्षेचा निकाल २७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर होणार आहे. या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील ५० टॉपर्स विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाला मुंबईच्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे. आॅनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था आ. बाळू धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षाचा आहे. भद्रावती येथील आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, प्राचार्य दोहतरे, प्रा. संजय आसेकर, कविश्वर शेंडे, शरद राजुरकर, अजय विधाते, बंडू दरेकर, विश्वास शेंडे, शरद राजुरकर, रुपेश ढवस, दादाजी राऊत, विनोद वानखेडे, विवेक आकोजवार, प्रमोद गेडाम, नितीन कवासे, संदीप वडाळकरे यांचे सहकार्य लाभले.