बागडे आणि फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

0
6

मुंबई- राज्यातील भाजप सरकारने विधानसभेत जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणा-या दोन याचिकांवर २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. केतन तिरोडकर आणि राजकुमार अवस्ती या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात बहूमत नसताना देखील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला.
विधानसभेत २८८ सदस्य आहेत. तर भाजपकडे केवळ १२३ आमदार आहेत. बहूमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असताना भाजपने बहूमत कसे काय सिद्ध केले. तसेच बहूमत सिद्ध करण्यासाठी आवाजी मतदानाचा वापर करण्यात आला. सभागृहातील १२३ सदस्यांनी मोठ्याने ओरडून १४५ सदस्य सरकारच्या बाजूने असल्याचे दाखवल्याचे तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे.
इतक नव्हे तर तिरोडकर यांनी फसवणूक आणि कट केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.