राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे राज्यपालांचे हस्ते शानदार समारंभात वितरण

0
7

मुंबई दि. २५ : स्वातंत्र्य दिन 2013 व 2014 आणि प्रजासत्ताक दिन 2014 मध्ये राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये शानदार समारंभात वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृह राज्यमंत्री (शहरे) रणजीत पाटील, अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व पदक प्राप्त अधिकारी/कर्मचारी यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक 6, पोलीस शौर्य पदक 41, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक 2, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस शौर्य पदक 1 अशा एकूण 50 जणांना गौरविण्यात आले.

मुंबई येथे 26 नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरतापूर्ण व शौर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परीक्षेत्र, औरंगाबाद आणि श्री. राजवर्धन, सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने तर दीपक ढोले, सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर, नितीन काकडे, सहायक पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, अरुण माने, पोलीस हवालदार, अशोक पवार, पोलीस नाईक, सौदागार शिंदे, पोलीस नाईक, अमित खेतले, पोलीस शिपाई, बृहन्मुंबई यांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले.

दि. 13 ऑगस्ट 2010 रोजी चेंबूर येथील गँगवार चकमकीत वीरतापूर्ण व शौर्यपूर्ण कामगिरीसाठी भीमदेव राठोड, सहायक पोलीस आयुक्त, संजय मोरे, पोलीस निरीक्षक, संजय भापकर, सहायक पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई यांना पोलीस शौर्य पदक तर दि. 4 एप्रिल 2013 रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल विशाल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे (ग्रामीण), कैलास टोकले, सहायक पोलीस निरीक्षक, ठाणे शहर, अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक पुणे (ग्रामीण), दिनकर तिम्मा, पोलीस हवालदार, शामनदास उईके, पोलीस नाईक, रामा कुडयामी, पोलीस नाईक, गडचिरोली तसेच दि. 24 नोव्हेंबर 2012 रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल वसंत खतेले, पोलीस उपनिरीक्षक, पालघर, प्रशांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक (ग्रामीण), प्रभुदास दुग्गा, पोलीस हवालदार गडचिरोली यांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले.

त्याचबरोबर दि. 19 फेब्रुवारी 2011 रोजी कोल्हापूर येथे कुख्यात गुन्हेगार पकडण्यात अतुलनीय शौर्याची कामगिरी बजावल्याबद्दल रवींद्र नुल्ले, पोलीस नाईक, अबुककर अब्दुलगनी शेख, कोल्हापूर यांना पोलीस शौर्य पदक तर गडचिरोली येथे दि. 19 ऑगस्ट 2011 येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरतापूर्ण व शौर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल परदेशी सुकुजी देवांगण (मरणोत्तर) पोलीस हवालदार गडचिरोली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी परदेशी देवांगण यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, तर विठ्ठल पवार, सहायक पोलीस निरीक्षक यांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2013 रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल गोविंद फरकाडे (मरणोत्तर) पोलीस नाईक गडचिरोली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा फरकाडे यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर सुधीर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई, नितिन बडगुजर, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई, भैय्याजी कुलसंगे, पोलीस हवालदार, नागेश टेकाम, पोलीस हवालदार,गडचिरोली यांना पोलीस शौर्यपदक व शगीर शेख, पोलीस नाईक, पंकज गोडसेलवार, पोलीस नाईक, गडचिरोली यांना राष्ट्रपती शौर्यपदक प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर 19 मे 2011 मध्ये गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरतापूर्ण कामगिरी केल्याबद्दल मुनशी पुंगाटी (मरणोत्तर) पोलीस शिपाई गडचिरोली यांच्या वतीने त्यांची बहीण लक्ष्मी पुंगाटी यांनी पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. तर शामनदास उईके, पोलीस नाईक, सरजू वेलादी, पोलीस नाईक, गडचिरोली यांनाही पोलीस शौर्यपदकाने गौरविण्यात आले.

त्याचबरोबर गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांवर परिणामकारक गोळीबार केल्याबद्दल संभाजी गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई भजनराव गावडे, पोलीस नाईक, कुमारशहा उसेंडी, पोलीस नाईक, गडचिरोली, दिगंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, धुळे, नागेश टेकाम, पोलीस हवालदार, येशु तुलावी, पोलीस नाईक, बन्नु हलामी, पोलीस नाईक, गडचिरोली, व्यंकटेश मुंगीवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, वासुदेव मडावी, पोलीस हवालदार, सुर्यकांत अत्राम, पोलीस नाईक रविकुमार गंधम, पोलीस नाईक, विजय सल्लम, पोलीस नाईक, पवन अर्का, पोलीस शिपाई, गडचिरोली यांना पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले.

तसेच विष्णू माने, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर व लक्ष्मण हवलदार, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, कोल्हापूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. तर केशव राणे, सेवानिवृत्त अप्पर उपआयुक्त, राज्यगुप्तवार्ता विभाग, मुंबई यांना गुणवत्तपूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले.