दीड कोटी भारतीयांना अंधत्व

0
23

जागतिक नेत्रदान पंधरवडा विशेष

गोंदिया दि. २६: जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात ४ कोटी ५० लाख लोकांना अंधत्व असल्याची धक्कादायक माहिती आहे. यापैकी १ कोटी ५० लाख नागरिक केवळ भारतातील आहेत. अंधत्वाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. त्या तुलनेत नेत्रदान करणाèयांची संख्या मात्र आजही खूपच कमी आहे. त्यामुळे अनेक अंध बांधवांना हे सुंदर जग बघण्याची संधी मिळत नाही. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान पंधरवडा असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.दरम्यान राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नेत्रदान पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदान महादान, जगतांना रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान याचे महत्व पटवून देण्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
नेत्रदान ही काळाची गरज असून दरवर्षी १ लक्ष नेत्रबुब्बुळाची गरज असून फक्त २० हजार ते ३० हजार पर्यंत नेत्रबुब्बुळे संकलीत होतात. डोळे ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. डोळ्याशिवाय जगणे ही कल्पनाच आपण करु शकत नाही. नेत्रदान हे पुण्यकर्म आहे. प्रत्येकाने नेत्रदान करण्याचा संकल्प करुन शपथ घेऊन जास्तीत जास्त संख्येने नेत्रदान संमत्तीपत्र भरुन दयावे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नेत्रदान समुपदेशक ७५८८८८०३०८, ९८२३५५२६०८ आणि नेत्रचिकित्सा अधिकारी ९६२३९५०९४२ यांचेशी संपर्क साधून नेत्रदानास पुढे यावे. नेत्रदान कुणीही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करु शकतो असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी म्हटले आहे.
जगात सर्वाधिक अंधत्वाच्या कारणांमध्ये मोतीबिंदू (६२.४ टक्के)चा समावेश आहे. कॉर्निया (बुबूळ खराब होणे) हे जगातील अंधत्वाच्या कारणांमध्ये वरच्या क्रमांकावरच आहे. या आजाराने सुमारे २५ टक्के लोकांना अंधत्व येते. जगातील सुमारे ८५ लाख कॉर्निया अंधत्वामध्ये भारतातील ३० लाख प्रकरणांचा समावेश आहे. दरवर्षी सुमारे २५ हजार ते ३० हजार नवीन अंधत्वाच्या रुग्णांची त्यात भर पडते.
कॉर्निया अंधत्वाच्या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्के मुलांचा समावेश असल्याने ही सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे. कॉर्निया अंधत्वाच्या प्रमुख कारणांमध्ये आहारातील ‘अङ्क जीवनसत्त्वाची कमी, रसायने, व्यवसाय, अपघात, संक्रमण, काही प्रकरणांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरचा निष्काळजीपणा तसेच काही जन्मजात कारणांचा समावेश आहे. कॉर्निया अंधत्व निवारण्यासाठी दरवर्षी अंदाजे २.५ लाख कॉर्निया प्रत्यारोपण आवश्यक आहे; पण भारतात दरवर्षी ५५ हजार नेत्रदान होत असून त्यातील ६० टक्के कॉर्निया प्रतिरोपणासाठी वापरल्या जाते.
भारतात ५६० नेत्रदान बँका आहेत. मात्र त्यापैकी केवळ १० ते १५ टक्के पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत आहेत. भारतात दरवर्षी मृत्यू होणाèया सुमारे ७५ लाख लोकांपैकी केवळ २३ हजार नागरिक नेत्रदान करतात. म्हणजे ०.३ ते ०.४ टक्के लोक मृत्यूनंतर नेत्रदान करतात. त्यामुळे देशात ५५ हजार नेत्रदानाकरिता बुबूळ प्राप्त होतात; परंतु यापैकी केवळ १५ ते २० हजार बुबूळच प्रत्यार्पणाकरिता वापरल्या जाते. इतर बुबूळ प्रत्यार्पणाला योग्य नसल्याने ते इतर कामांकरिता वापरल्या जातात.मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे डोळे लगेच बंद करा. मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर पण ६ तासाच्या आत डोळे काढल्यास ती बुब्बुळे रोपण करण्यास उपयोगी पडू शकतात.