28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

0
23

जि.प.अध्यक्ष : कारवाई करण्याचे निर्देश

गोंदिया, दि. २६:सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी सोमवारी (दि.२४) भेट घेतली. यावेळी योग्य न्याय देत आरोपीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आरती बारसे हिच्या हत्येचे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव कुटुंबियांकडून घेतले जात असताना पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उषाताई मेंढे यांनी बारसे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरण जाणून घेत घटनास्थळाची पाहणीही केली.

याप्रसंगी त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांशी मोबाईलवरून संवाद साधला व प्रकरणाबाबत चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना पकडून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच गरज भासल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योग्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी बारसे कुटुंबीयांना दिले.

blank