बीएचएमएस विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
7

संस्थेने नाकारली २६ विद्याथ्र्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी

गोंदिया, दि. ८ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी प्राचार्य आणि संस्थेने नाकारली. त्यामळे बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेल्या अंतीम वर्षाच्या २६ विद्याथ्र्यांचा वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली. याच विवंचनेत प्रिती दमाहे या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
सूर्याटोला परिसरात असलेल्या गोंदिया होंमीओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल येथील अंतीम वर्षाच्या विद्याथ्र्यांना विद्यालय प्रशासनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वार्षीक परीक्षेचा अर्ज भरू दिला नाही. त्यामळे प्रचंड मानसीक दडपण आले असल्याचा आरोप विद्याथ्र्यांनी केला. प्राचार्य आणि त्यांचे पती डॉ. रोशन कानतोडे तसेच संस्थापक आपल्याला वारंवार त्रास देवून आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. तणावामुळे प्रिती दमाहे या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विद्यालय प्रशासनाची अशीच भूमिका राहिल्यास उर्वरित विद्यार्थी देखील आत्महत्या करतील, असेही विद्याथ्र्यांनी सांगीतले. तक्रार केल्यास प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी देखील महाविद्यालय प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत प्राचार्य, त्यांचे पती आणि संस्थापक यांना महाविद्यालयीन कारभारापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी विद्याथ्र्यांनी प्रसिद्धीपत्रातून केली.

विद्यापिठाच्या नियमानुसार थेअरीत ७५ टक्के आणि प्रात्यक्षिकात ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, या विद्याथ्र्यांची उपस्थिती ३० ते ४० टक्के आहे. उपस्थिती विद्यापिठाकडे पाठविण्यात आली. त्यांनी परीक्षेला बसू देवू नये, अशी सूचना केल्यामुळे आम्ही नियमांचे पालन केले. पुन्हा सहा महिने आमच्या हातात आहेत, या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याकरिता विद्याथ्र्यांना पाचारण केले. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. विद्याथ्र्यांनी महाविद्यालयावर केलेला आरोप पूर्णतः चुकीचा आहे. आम्ही मर्जीने काहीही केले नाही. विद्यापिठाच्या नियमांचे पालन केले.
डॉ. हर्षा कानतोडे
प्राचार्य, गोंदिया होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल