राज्यातील कोतवालाना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या

0
20

गोंदिया,दि.9-राज्यातील सर्व गावपातळीवर असलेल्या कोतवालांना चतुर्थ कर्मचारी श्रेणीचा दर्जा देण्यात यावे.तसेच शासकीय कार्यालयातून दलालांचा हस्तक्षेप थांबविण्यात यावा या मांगण्यांना घेऊन आज शुक्रवारला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोतवाल संघटनेच्यावतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य कोतवाल संघर्ष समिती गोंदिया च्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यलयावर आपल्या विविध मागण्यान करिता मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात जिल्यातील ३०० च्यावर कोतवाल सहभागी झाले होते. ग्रामीण किवा शहरी भागात कोतवाल हा तलाठ्याचा उजवा हाथ समजला जातो. गावा विषयी अधिक माहिती कोतवालाकडे उपलब्ध असते तरीही दिवसेंदिवस शासकीय कार्यलयात किवा तलाठी कार्यलयात दलालांचा वाढता हस्तक्षेप बघून कोतवालाला तलाठ्या कढून चागली वर्तणूक मिळत नाही. तसेच राज्य सरकारच्या इतर कर्मचार्याप्रमाणे कोत्वालानाही चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा ,सेवा निवृत्त कोत्वालाना किवा दिवंगत कोतवालांच्या विधवा पत्नीला ३००० रुपये प्रती महीना निर्वाह भत्ता देण्यात यावा ,कोतवालांच्या वारसांना रिक्त जागेवर नियुक्त्या देवून सन्मानाने जगण्याची संधी द्यावी ,मानसिक शारीरिक शोषन थाब्विण्यात यावे. कोतवालाना जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी तोंडी लेखी आदेश देवून गैरशासकीय कामे करून घेतली जातात,हे थांबविण्यात यावे अश्या विवध मागण्यांना घेवून आज आंदोलन करण्यात आले.या मागंण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.