पालकमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अस्थीधातू कलशाचे दर्शन

0
12

गोंदिया,दि.२० : महाकारुनिक तथागत गौतम बुध्दांच्या श्रीलंकेतून आणलेल्या अस्थीधातू कलशाचे गोंदिया जिल्हयात नुकतेच आगमन होताच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक/अर्जुनी येथे स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्री बडोले हे गोंदियाला अस्थी कलशासोबत आले. अस्थितधातू कलश दर्शन समिती, बौध्द समाज संघ आणि भारतीय बौध्द महासभा गोंदिया यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून बुध्दांच्या पवित्र अस्थितधातू आगमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अस्थिधातू कलश मनोहर चौक, गोविंदपूर, छोटा गोंदिया, संथागार विहार मरारटोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, श्रीनगर मार्गे भिमनगर येथील बुध्द विहारात रॅलीचा समारोप झाला. मैत्रेय बुध्द विहार येथे महापरित्राण पाठ व धम्मदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. मेत्तानंद महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल दिले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचेसह भदंत चंद्रकिर्ती, भदंत आचार्य सोमानंद, भदंत संघधातू, भदंत वन्नास्वामी, भदंत आनंद, भदंत लोकपाल, भदंत धम्मसिखर, भिक्शुणी पोर्णिमा तसेच बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संथागार विहाराचे अध्यक्ष उमेश नागदेवे, अरुण गजभिये, सुरेंद्र खोब्रागडे, महेंद्र कठाणे, मैत्रेय बौध्द विहार समितीचे पदाधिकारी व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.