शेतकरी काढणार अदानीची पाइपलाइन

0
4

तिरोडा दि.२०-येथील अदानी वीज प्रकल्पाला लागत असलेले पाणी वाहून नेण्ङ्मासाठी पाच गावातील शेतकèयांच्या शेतातून टाकण्यात आलेल्या पाईप लाइनचा अतिरिक्त मोबदला देण्यात अदानी प्रकल्पाकडून फसवणूक झाल्ङ्माचा आरोप करण्ङ्मात आला आहे.२१ ऑक्टोबर पर्यंत अनुदान देण्यात न आल्ङ्मास टाकण्यात आलेली पाईप लाइन काढण्याचा इशारा कवलेवाडा,चिरखेनी,खैरबोडीच्ङ्मा शेतकèयांनी जिल्हाधिकारी डॉ.विजङ्म सूर्यवंशी ङ्मांना दिलेल्ङ्मा निवेदनात दिला आहे.
अदानी प्रकल्पात वीज निर्‘िती करिता पाण्याची गरज भासते यासाठी जवळच्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प येथून या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाईप लाइन धापेवाडा पासून कवलेवाडा, चिरेखनी, खैरबोडी या गावातील ११५ शेतकèयांच्या शेतातून टाकण्यात आली आहे.अदानी प्रकल्पाकडून शेतकèयांना प्रती हेक्टर ८ लाख रुपये मोबदला व कुटुंबातील एकास कंपनीमध्ये नोकरी देण्याचे करार करण्यात आले होते. त्यादरम्यान ११५ शेतकèयांपैकी ९० शेतकèयांशी दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत करार केला, तर कवलेवाडा येथील उर्वरित २५ शेतकèयांशी १०० रुपयाच्या साद्या स्टॅम्प पेपर वर करार केला. निबंधक कार्यालयात करण्यात आलेल्या करारनाम्यात ज्या शेतकèयांच्या ज‘िनीतून पाईप लाइन टाकण्यात आली त्यांना प्रती हेक्टर ८ लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी तर १०० रुपयाच्या स्टॅम्प वर करण्यात आलेल्या करारनाम्यात नोकरीचा उल्लेखच करण्यात आला नाही. कालांतराने कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात आली नसल्याने प्रकल्पाकडून नोदणीकृत करार करण्यात आलेल्या ९० शेतकèयांना नोकरीऐवजी ५ लाख रुपये अतिरिक्त देण्याचे ठरविण्यात आले. तर तशी रक्कमही संबंधित शेतकèयांना देण्यात आली. मात्र उर्वरित २५ शेतकèयांना असा करार करण्यात आला नसल्याचे सांगून डावलण्यात आले. दरम्यान उर्वरित सर्वच २५ शेतकèयांनी आपल्यावर अन्याय होत असून न्याय मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अ‘ित सैनी यांना ७ नोव्हेंबर २०१३ रोजी निवेदन दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. सैनी यांनी तिरोडाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन संबंधित शेतकèयांना अतिरिक्त मोबदला देण्याचे निर्देश दिले