केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडा दौ-यावर

0
7

 मुंबई,दि. १६-मराठवाडा  दुष्काळाने होरपळणा-या मराठवाड्यातील शेतक-यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडय़ाच्या पाहणी दौ-यावर येत आहे.

केंद्रीय पथकाचा हा चार दिवसांचा दौरा आहे. यात पथकातील अधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करून शेतक-यांसोबत संवाद साधणार आहेत.त्याचबरोबर दुष्काळाने झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाच्या दौ-यानंतर केंद्राकडून दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर होणार का, याकडे संपूर्ण मराठवाडय़ाचे डोळे लागले आहेत.