वीरपुत्राला पोगरवाडीत अखेरचा सलाम

0
8
सातारा- जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथील जंगलात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी संतोष यांचे पार्थिव मूळगाव पोगरवाडीत तासभर दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल संतोष यांच्या 6 वर्षाच्या मुलाने आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. आपल्या लाडक्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
साता-याचा सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव सकाळी 11च्या सुमारास मूळगावी पोगरवाडीत आणण्यात आले. त्याआधी आरेदरे येथे संतोष यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता यावे म्हणून ठेवण्यात आले होते. तेथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संतोष यांना मानवंदना देत अखेरचा सलाम ठोकला.